मुक्त विद्यापीठातर्फे “श्रमसेवा २०२३” पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या श्रमसेवा पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल, रूपये २१,०००/- (रूपये एकवीस हजार) रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University,, Gyan Gangotri, Nashik ycmou

आपल्या श्रम आणि सेवेने उपेक्षीत वर्गातील्या महिलांची उन्नती करणाऱ्या महिलेला किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, रूग्ण, अनाथ ह्यांच्यासाठी विशेष कार्य करणाऱ्या व सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांनी किंवा महिलांच्या संस्थांनी आपल्या कार्यांची संपूर्ण माहिती फोटो, वृत्तपत्र कात्रणे, सी डी इत्यादीसह तसेच वैयक्तिक कार्याविषयी किंवा संस्थेविषयी संक्षिप्त परिचय/टिपण्णीसह सविस्तर प्रस्ताव विद्यापीठाच्या वेबसाईट https://ycmou.digitaluniversity.ac वरुन छापील अर्ज प्रिंट काढून  दिनांक २६ ऑगस्ट, २०२३ पर्यंत खालील पत्त्यावर पाठविण्यात यावे.

Advertisement

प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा संजीव सोनवणे आणि प्र – कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्काराबाबत पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल,असे आवाहन कुलसचिव दिलीप भरड व प्र प्रमुख, डॉ दयाराम पवार, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

प्रस्ताव पाठविण्याचा त्ता :

प्र प्रमुख, विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्र,

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,

ज्ञानगंगोत्री, गोवर्धन शिवार, गंगापूर धरणाजवळ,

नाशिक – 422 222

दूरध्वनी क्रमांक : (0253) 2230127                                                           ईमेल : dir_dsw@ycmou.digitaluniversity.ac

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page