संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बुध्दिस्ट स्टडीज सेंटर येथे बुध्द जयंती साजरी
भारताला युध्दाची नाही, तर बुध्दाची गरज – डॉ संतोष बनसोड
अमरावती : आज भारताला युध्दाची नाही, तर बुध्दाची गरज आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ संतोष बनसोड यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील बुध्दिस्ट स्टडीज सेंटर येथे आयोजित बुध्द जयंती प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भगवान गौतम बुध्दांच्या प्रतिमेचे पूजन, मेणबत्ती प्रज्वलन करुन बुध्द वंदना घेण्यात आली.

डॉ संतोष बनसोड म्हणाले, भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाने प्रेमाचा संदेश आणि अहिंसेचा विचार आजपासून 2500 वर्षांपूर्वी दिला. या विचाराची आज भारताला गरज आहे. म्हणून भारताला युध्द नको, तर बुध्द पाहिजे.
जयंती कार्यक्रमाला डॉ रत्नशिल खोब्राागडे, डॉ प्रेमानंद तिडके, डॉ अनिल नाईक, डॉ कपिल कांबळे, प्रा रामचंद्र वरघट, भीमराव वाठोरे, प्रभाकर भाले आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बुध्दिस्ट स्टडीज सेंटरचे समन्वयक प्रा नागले, संचालन मैत्रेय खोब्राागडे, तर आभार कामिनी गुडधे यांनी मानले.
