अखिल भारतीय सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाला कास्य पदक
जळगाव : बंगळूरू विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय सॉफ्टबॉल (पुरुष) स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाला कास्य पदक प्राप्त झाले. बंगळूरू विद्यापीठात दि १३ मे ते १८ मे दरम्यान अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल (पुरुष) क्रीडा स्पर्धा झाली. या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कालीकत विद्यापीठवर ५ – ० ने विजय मिळवित पात्रता फेरीत प्रवेश केला व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी झालेल्या सामन्यात ७ – ३ ने विजय मिळवित कास्य पदक पटकावले.
या संघामध्ये मोहित चौधरी, वेदांत आर्डे, अनिकेत पाटील, चिराग देवरे, निलेश जावरे, मोहित पाटील, (सर्व जेडीएमव्हीपीएस महाविद्यालय,जळगाव), धिरज बाविस्कर,राज भिलारे, गौरव चौधरी, मयुरेश औसेकर (मु जे महाविद्यालय, जळगाव) सिध्दांत पाटील, ललीत बाविस्कर (धनदाई माता महाविद्यालय, अमळनेर ), स्वप्नील मोरे, लोकेश चौधरी, (पी एम जी व्ही पी महाविद्यालय शहादा), उमेश विसपुते (सदगुरू शा शि महाविद्यालय, जळगाव) या विद्यार्थ्यांचा समावेश होता. संघ प्रशिक्षक म्हणून प्रा संजय जाधव (जी एच रायसोनी महाविद्यालय, जळगाव) यांनी काम पाहिले. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे, कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी अभिनंदन केले अशी माहिती क्रीडा संचालक डॉ दिनेश पाटील यांनी दिली.