अमरावती विद्यापीठाची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी
पुनम कैथवास सुवर्णपदकाची मानकर
अमरावती : नुकत्याच चंदीगढ विद्यापीठ, मोहाली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉÏक्सग (महिला) स्पर्धेत स्थानिक श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची खेळाडू पुनम कैथवास हिने 57 ते 60 किलो वजन गटात देशातील सर्व विद्यापीठांच्या खेळाडूंना पराजित करुन सुवर्ण पदक प्राप्त केले. अतिशय चुरशीच्या अंतिम सामन्यात तिने मणिपूर विद्यापीठाच्या खेळाडुला पराजित करुन सुवर्ण पदकावर आपले नाव अंकित केले.
बॉÏक्सग या क्रीडा प्रकारात महिला गटात सुवर्ण पदक प्राप्त करणारी पुनम ही पहिलीच खेळाडू ठरली असून तिने नवा इतिहास रचला असून विद्यापीठाच्या लौकीकात भर घातली आहे. या विजयामुळे तिची निवड फेब्राुवारी महिन्यात संपन्न होणा-या खेलो इंडिया या स्पर्धेकरीता झाली आहे. विद्यापीठाव्दारे संघाचे व्यवस्थपक म्हणून डॉ. पी.व्ही. पिंगळे, राजर्षि शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा, तर व्यवस्थापक म्हणून डॉ. गजानन बढे, संत गजानन महाराज कला महाविद्यालय, बोरगांव मंजू यांची नियुक्ती करण्यात आली होती. पुनम हिने प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल नवनियुक्त कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, क्रीडा संचालक डॉ. अविनाश असनारे आणि प्राधिकारिणींच्या सर्व सदस्यांनी तिचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.