सौ के एस के महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शन संपन्न
बीड : नवगण शिक्षण संस्थेचे सौै केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ एस आर रंगनाथन यांच्या जयंती निमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन उपप्राचार्य डॉ संजय पाटील देवळाणकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना त्यांनी ग्रंथ वाचनाचे महत्व विशद करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास व व्यक्तीमत्व जडण घडणीत वाचनाचे महत्व सांगीतले. ग्रंथ प्रदर्शनात शब्दकोष, ज्ञानकोष, चरित्रे, आत्मचरित्र, स्पर्धा परिक्षेचे पुस्तके तसेच डॉ दीपाताई क्षीरसागर यांची ग्रंथसंपदा ग्रंथ प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ग्रंथपाल शेख जी आय यांनी केले.
या प्रसंगी डॉ सुधाकर गुट्टे, डॉ विश्वांभर देशमाने, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ ए एस खान, कमवि उपप्राचार्य काकडे एन आर, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदीसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ग्रंथालय लिपीक खाडे एल डी, मुळे एस एस, सय्यद जैद, आकाश घोडके यांनी परिश्रम घेतले.