राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
ग्रंथालय व माहिती शास्त्रीय विभाग आणि महिला अध्ययन व विकास केंद्राचे आयोजन
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग आणि महिला अध्ययन व विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने लाइफलाइन रक्तपेढी आणि प्रयोगशाळा नागपूर यांच्या सहकार्याने बुधवार, दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सलग तिसऱ्या वर्षी विभागात विभागात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यापिठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ देवेंद्र भोंगाडे, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ प्रशांत कडू, ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक तसेच विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ आणि लाइफलाइन रक्तपेढी आणि प्रयोग शाळेचे वैद्यकीय संचालक डॉ हरिशजी वारभे कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभले.
शैक्षणिक विभागात शैक्षणिक कार्यकम तर होतच असतात. परंतु सामाजिक बांधिलकी जपणारा रक्तदान शिबीर सारखा कार्यक्रम यशस्वी करणारे हे विभाग म्हणजे कौतुकास प्राप्त आहे, या शब्दात डॉ देवेंद्र भोंगाडे यांनी प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते आणि ते विभागातर्फे सलग तिसऱ्या वर्षीच्या आयोजनाबद्दल कौतुक करून डॉ विजय खंडाळ यांनी शुभेच्छा दिल्या.
विभाग प्रमुख डॉ मंगला हिरवडे यांचे योग्य मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले. विभागातील प्राध्यापक डॉ शालिनी लिहितकर, डॉ सत्यप्रकाश निकोसे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी झाले. माजी विद्यार्थी रजत चोपडे आणि चमू यांचा मोलाचा कार्यभाग शिबीरास लाभला. विभागातील डॉ प्रिती उमरेडकर यांनी सुत्रबद्ध शब्दात उद्घाटन समारंभाचे संचालन केले. कार्यक्रमास रक्तदात्यांचा भरगोस प्रतिसाद मिळाला.