बी के वैष्णवी खैरनार यांना यौगीक सायन्स विषयात पीएच डी प्रदान
आय व्ही एफ आणि यौगीक जीवनशैलीवर प्रथमच मौलिक संशोधन
जळगाव : बी के वैष्णवी यांनी योगा युनिर्व्हसीटी ऑफ द अमेरिकन्स, फ्लोरिडा येथील विद्यापीठात डेव्हलपमेंट अँड व्हॅलीडेशन ऑफ होलिस्टीक एज्युकेशनल मॉड्यूल ऑफ योगीक लाईफ स्टाईल फॉर एस्पायरिंग कपल्स एट आयव्हीएफ, आययुआय या विषयावर यौगीक सायन्स विद्याशाखेमध्ये प्रा डॉ ई व्ही स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली मौलिक संशोधन केले. बंगलौर येथे झालेल्या पदवी प्रदान समारंभात त्यांना पीएच डी प्रदान करण्यात आली.
योगीक जीवनशैली अवलंबिल्यास आचार आणि विचारांवरील सकारात्मक प्रभावावर त्यांनी नवीन शैक्षणिक आयामांचा (मॉड्यूल) विकास आणि प्रमाणीकरण केले. आय व्ही एफ प्रकारात हे नाविण्यपूर्ण संशोधन असल्याने सध्याच्या आधुनिक जीवनशैलीत याचा फार उपयोग होणार असल्याचे मार्गदर्शक प्रा डॉ ई व्ही स्वामीनाथन यांनी सांगितले.
बी के वैष्णवी खैरनार या ब्रह्माकुमारीज् विद्यालयाच्या समर्पित भावनेने सेवारत असून नियमित राजयोग अभ्यासी आहेत. जळगाव येथील टिपटॉप टेलर रविंद्र खैरनार आणि प्रतिभा खैरनार यांच्या त्या कन्या असून लहानपणापासूनच त्यांनी राजयोगाच्या विविध प्रयोगांवर अभ्यास केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी आणि समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.