महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलींद निकुंभ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी वित्त व लेखाअधिकारी श्री. एन.व्ही कळसकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी महेंद्र कोठावदे, वाय. जी. पाटील, राजेंद्र नाकवे, सुरेश शिंदे, मनोज वटाणे, अनिल बहीराम, विष्णू पवार, नंदकिशोर दहिवतकर, आबाजी शिंदे, किशोर गांगुर्डे, विनायक ढोले, पुष्कर तÚहाळ, कृष्णा भवर, पवन रुद्राक्षवार, वैभव ढवळे, सचिन जोशी, संभाजी गायकवाड, दिलीप राजपुत आदी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.