‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये बायोटेक्नॉलॉजी दिवस साजरा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीतील जैवशास्त्र संकुलामार्फत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ नोव्हेंबर रोजी ‘बायोटेक्नॉलॉजी दिवस’ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.शेती, मानवी आरोग्य, औषध निर्मिती, पर्यावरण-प्रदूषण व उपाय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर, लसींचा शोध, प्राण्यांची उपयोगिता इत्यादी बद्दल चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील एव्हिड डायग्नोस्टिक्स बायोइंजीनिअरिंग चे संचालक मोहन भागवत व शेगाव येथील ए.आय.सेन्स.एल.एल.पी. फाउंडर चे संतोष बोथे या दोन तज्ञांना निमंत्रित करण्यात आले होते.
स्टार्टअप सुरू करणे, प्रदेशात नोकरी, देशात व प्रदेशात उद्योग व कंपनी सुरू करणे, कन्सल्टन्सी सुरू करणे यासाठी विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक शिक्षण घ्याव व या क्षेत्रात प्रवेश करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम.के. पाटील, जैवशास्त्र संकुलाचे संचालक प्रो. एस.पी. चव्हाण, डॉ. टी.ए. कदम यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस.पी. पाठक, प्रा. एच.जे. भोसले, प्रा. ढवळे, प्रा. डॉ. मिलिंद गायकवाड, प्रा. डॉ. अमृता कनकदंडे, प्रा. रुबीया शेख, प्रा. दुलधज, प्रा. बेग व संशोधक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.