महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात जैवविविधता सर्वेक्षण शिबिर उत्साहात संपन्न
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नाशिक येथील अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात जैवविविधता सर्वेक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले.
याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प वि से प, अ वि से प, वि से प यांनी सांगीतले की, विद्यापीठाचा ग्रीन कॅम्पस सुंदर पध्दतीने विकसित करण्यात आला आहे. या परिसरात वेगवेगळया प्रकारचे पक्षी आहेत.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोणातुन या परिसरात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली असून यावर अधिवास करणारे विविध प्रजातींचे पक्षी निदर्शनास येतात. विद्यापीठात तयार करण्यात येणाऱ्या इक्षणा या वस्तुसंग्रहालयामध्येे परिसर जैवविविधते संदर्भात माहितीसाठी विशेष जागा करण्यात येईल त्याची डॉक्युमेंटरी तयार केली जाईल जेणेकरुन या म्युझियमला भेट देणाऱ्या विध्यार्थांना निसर्गाची ओळख होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाकडून इथल्या निसर्गाची काळजी घेण्यात येते तसेच विद्यापीठ परिसरात जलसाठा असल्याने मोठया प्रमाणात पक्षांचा वावर आढळतो. काही दिवसांपुर्वी बिबटयाचा वावर विद्यापीठ परिसरात झाला होता अशा पध्दतीने एक आगळी वेगळी जैवविविधता दिसून येते असे त्यांनी सांगितले. यावेळी अरण्यानी बायोकन्झरवेशन सोसायटीचे सल्लागार सतीश गोगटे यांनी सांगीतले की, विद्यापीठाचा परिसर निसर्गरम्य असून पक्ष्यांकरीता सुयोग्य वातावरण आहे. येथील पक्ष्यांच्या अधिवासाकरीता विविध वृक्ष गवताळ भाग त्यांच्या खाद्यासाठी महत्वपुर्ण आहे.
या सर्वेक्षणाकरीता आमच्या टिमने परिश्रम घेतले असून विद्यापीठ आवारात मोठया संख्येने असलेली वनसंपदा ही पक्षांसाठी संजीवनी आहे. आजच्या सर्वेक्षणातून मिळालेली माहिती एकत्र करुन त्यावर शॉर्ट फिल्म करण्याचा मानस आहे. ही माहिती भविष्यात विद्यार्थी व अभ्यासकांना मार्गदर्शक ठरेल. या हंगामातील नाशिक जिल्यातील हा पहिलाच प्रि-मान्सुन फॉरेस्ट बर्ड सर्व्हे आहे. यावेळी विद्यापीठ परिसरात पक्षीनिरीक्षणाच्या सर्वेक्षण मध्ये पर्पल सनबर्ड, पर्पल रंप्ड सनबर्ड, टिकेलब्लू फ्लायकॅचर, टेलर बर्ड, लहान मिनीवेट, बाया, खवले स्तनधारी मुनिया आणि त्यांच्या वैभवशाली शेपटीसह असंख्य मोर अशा सुंदर पक्षी दिसले, पायड क्रेस्टेड कोकिळ आणि लग्गर फाल्कन सारखे दुर्मिळ पक्ष्यांसह विविध 52 प्रजातींचे पक्षांच्या जाती व 595 पक्षी आढळून आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ सिमा पाटील यांनी सांगितले की, पावसाळयाच्या दिवसात कमी प्रमाणात पक्षी असतात कारण त्यांना अन्नाच्या शोधार्थ फारसे फिरावे लागत नाही काही कालावधीनंतर पुनश्च सर्वेक्षण केले जाईल तेव्हा अधिक पक्षी व विविध प्रजाती आढळून येतील असे त्यांनी सांगितले.
या शिबिरामध्ये कर्नल वरुण माथुर, अमोल दराडे, डॉ सीमा पाटील, डॉ अदिती शेहरे, डॉ सचिन गुरुळे, नितीन बिलदिकर, अनंत सरोदे, डॉ जयंत फुलकर, सतीश कुलकर्णी, ज्योती राजपुत, शाहरुख मणियार, गायत्री नारायणे, संकेत शेलार, साक्षी पाटील, राजेश यादव, संदीप काळे, बाळासाहेब अडसरे, रोशन पोटे, ओंकार चव्हाण, प्रमोद दराडे, गणेश वाघ, गंगाधर आघाव, पंकज चव्हाण, अमोल डोंगरे, विकास गारे, रोहित मोगल आदी सहभागी होते.