एमजीएम आणि लिमरिक विद्यापीठ यांच्या मध्ये द्विपक्षीय सहयोग बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर : एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, मदर तेरेसा नर्सिंग महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि आयर्लंडमधील लिमरिक विद्यापीठ यांच्यात नवी मुंबईतील एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स कॅम्पसमध्ये द्विपक्षीय सहयोग बैठक संपन्न झाली. लिमरिक युनिव्हर्सिटीचे ग्लोबल पार्टनरशिप अधिकारी श्री.जेम्स सार्जंट यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने दोन संस्थांमधील विद्यार्थी आणि फॅकल्टी एक्स्चेंज, स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम, संशोधन सहयोग आणि प्राध्यापक आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी आरोग्य शिक्षण कार्यक्रमांसह धोरणात्मक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.

एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपीमधील विद्यार्थी एमजीएम आणि लिमेरिक विद्यापीठ यांच्यात या वर्षाच्या सुरुवातीला स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य करारानंतर ही बैठक झाली. ह्या वेळी संस्थेचे प्राचार्य डॉ.सरद बाबू, डॉ. सतीश बुईटे, प्रशासकीय प्रमुख प्रेरणा दळवी, उपप्राचार्य विश्वनाथ बिरादार,डॉ.डॉस प्रकाश उपस्थित होते. या द्विपक्षीय बैठकीसाठी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम.जाधव आणि सचिव अंकुशराव कदम यांनी मार्गदर्शन केले.