श्री बंकटस्वामी महाविद्यालयातून संरक्षण क्षेत्रात मोठी भरती

बीड : श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्रसेना विभाग संरक्षण विभागात भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांना राजमार्ग ठरला आहे. राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे कॅप्टन डॉ जगन्नाथ चव्हाण यांची कडक शिस्त प्रोत्साहन आणि अचूक मार्गदर्शन यामुळे महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी पोलीस अग्निशामक दल सैनिक संरक्षण दलातील नर्सिंग विभाग अशा विविध सरकारी विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरती होत आहेत.

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेची गौरवशाली परंपरा असून कॅप्टन जगन्नाथ चव्हाण यांच्या समर्पित सेवेमुळे या विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बहुजन समाजातील शेतकरी पुत्रांना सन्मान जनक केंद्र शासनाचे नोकरी प्राप्त होत आहे.

Advertisement

यावर्षी विविध पदावर कार्यरत असलेले राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी रोहन पवळ आर्मी व्हेटर्नरी ड्युटी, आप्पासाहेब चव्हाण आर्मी नर्सिंग, अशोक आघाव आर्मी अर्टलरी, शिवाजी खवणे आर्मी अर्टलरी, अविनाश पोकळे आर्मी जनरल ड्युटी,आदित्य आमटे आर्मी जनरल ड्युटी, सचिन खेडकर आर्मी जनरल ड्युटी, आकाश राजंवन आर्मी जनरल ड्युटी, राज रोंगे आर्मी जनरल ड्युटी, पवन थोरवे आर्मी जनरल ड्युटी, गणेश दिडुळ आर्मी जनरल ड्युटी, अनिकेत कांबळे आर्मी जनरल ड्युटी, जालिंदर अवघड मुंबई पोलीस, विद्या वाघमारे मुंबई पोलीस, संभाजी जाधव अग्निशमन दल मुंबई याचा महाविद्यालयाला अभिमान आहे.

राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी कॅप्टन डॉ जगन्नाथ चव्हाण व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page