डी वाय पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार

पुणे : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडिया (अॅम्पी) कडून प्रतिष्ठित “डॉ. एम. एस. अगरवाल यंग इन्व्हेस्टिगेटर पुरस्कार”ने सन्मानित करण्यात आहे. हैदराबाद मधील बसवतरकम इंडो अमेरिकन कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या ४ व्या अॅम्पीकॉन वार्षिक परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Advertisement
Best Poster Presentation Award to Ranjit of D. Y. Patil University, Pune

अॅम्पीकॉन 2024 मध्ये भारतातील आणि परदेशातील २६ संस्थांमधून १०० हून अधिक पोस्टर सादरीकरण झाले. यापैकी २० सर्वोत्तम पोस्टर मधून रणजीत सी. पी. यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ‘इव्हॅल्युएशन ऑफ बीम डिलिव्हरी इन पेन्सिल बीम स्कॅनिंग प्रोटॉन थेरपी सिस्टम युसिंग एन इनहाऊस ऑटोमेटेड टूल युजिंग लॉग फाईल डेटा’ या विषयावर त्यांनी सदरीकरण केले होते. रणजीत सी. पी. यांचे हे यश डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि संशोधनातील प्रगतीचे प्रतीक असून वैद्यकीय भौतिकशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाला अधोरेखित करते.

रणजीत यांचे कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे, रिसर्च गाईड डॉ. के. मयकांनान यानी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page