”बामु” विद्यापीठाच्या नामांकित माजी विद्यार्थ्यांची पुस्तिका प्रकाशित करणार

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण, संशोधन केलेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांची सचित्र माहिती असणारी पुस्तिका लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची २३ ऑगस्ट १९५८ रोजी स्थापन करण्यात आली. दोन विभागावर सुरु झालेल्या विद्यापीठाचा विस्तार आता ५५ विभागांवर पोहचला आहे. छत्रपती संभाजीनगरातील मुख्य परिसरात ४५ विभाग असून धाराशिव उपपरिसरात १० उपविभाग आहेत. गेल्या ६६ वर्षात अनेक विद्यार्थी संशोधकांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. यामध्ये शिक्षण, संशोधन, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, राजकारण, प्रशासन, चित्रपट आदी क्षेत्राचा समावेश आहे. अशा सर्व माजी विद्यार्थ्यांची सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याचे काम विद्यापीठाने हाती घेतले आहे.

Advertisement

कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर काम सुरु करण्यात आले आहे. प्रकुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शन ही लाभत आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ जी डी खेडकर, प्लेसमेंट ऑफीसर डॉ गिरीष काळे व डॉ आर के प्रिया व रोहन गावडे यासाठी प्रयत्नशील आहेत. विद्यापीठ लवकरच नॅकच्या चौथ्या सायकलला सामोरे जात असून स्वयं मूल्यमापन अहवाल (एसएसआर) बनविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठ मुख्य परिसर व उपपरिसरातील विभागप्रमुखांनी येत्या ३१ मे पर्यंत आपल्या नामांकित माजी विद्यार्थ्यांची माहिती (किमान पाच माजी विद्यार्थी) पाठवावी असे ’आयक्वॅक’ तर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page