डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा च्या दीक्षांत समारंभासाठी आवेदनपत्र मागविले
पीएच डीधारकांनीही येत्या ३१ मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६४ वा दीक्षांत समारंभ येत्या १३ जून रोजी घेण्यात येणार आहे. या सोहळ्यास पदवी घेण्यासाठी पदवीधारक व पीएचडी धारकांकडून येत्या ३१ मेपर्यंत आवेदनपत्र मागिविण्यात आले आहेत. ६४ व्या दीक्षांत समारंभासाठी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी १३ जून ही तारीख दिली आहे. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. या बैठकीनंतर दीक्षांत सोहळ्यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने परिपत्रक जारी करण्यात आली आहे.
यात म्हटले आहे की, ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ आणि मार्च/ एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण व पदवीस पात्र स्नातकांना त्या-त्या पदव्यांचा अनुग्रह करण्यासाठी ६४ वा दीक्षांत समारंभ गुरुवार १३ जून रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. त्यास्तव पदवीस पात्र स्नातकांना उपस्थितीत व अनुपस्थितीत पदव्यांचा अनुग्रह करण्यासाठी पदवी आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. करिता, ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ आणि मार्च/ एप्रिल २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या व त्या-त्या पदवी पात्र अशा स्नातकांनी पदवी आवेदनपत्र दिनांक ३१ ते २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यापीठाच्या परीक्षा विभागात व्यक्तिशः अथवा टपालाने प्राप्त होतीत या बेताने पदवी आवेदपत्रासाठी लागणा-या सर्व आवश्यक कागदपत्रास सादर करावीत.
पदवी आवेदन पत्राच्या शुल्कासंबंधीचे वितरण खालीलप्रमाणे
पदव्युत्तर अभ्यासक्रमानंतरचे अभ्यासक्रम पदवी प्रमाणपत्रासाठीचे शुल्क रुपये ५००/- व टपाल शुल्क (महाराष्ट्रातील रहिवाशी स्नातकांसाठी शुल्क) ५०/- रुपये तसेच टपाल शुल्क (महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवाशी स्नातकांसाठी शुल्क) १००/- रुपये. याप्रमाणे पीएच.डी अभ्यासक्रमासाठी ६००/- रुपये शुल्क व टपाल शुल्क (महाराष्ट्रातील रहिवाशी स्नातकांसाठी शुल्क) ५०/- रुपये तसेच टपाल शुल्क (महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवाशी स्नातकांसाठी शुल्क) १००/- रुपये या प्रमाणे असतील.
उपरोक्त प्रमाणे ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ आणि मार्च/ एप्रिल २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या व पदवीस पात्र स्नातकांनी येत्या ३१ मेपर्यंत आवेदनपत्र सादर करावीत, असे आवाहन संचालक परीक्षा व मुल्यमापन मंडळ डॉ भारती गवळी यांनी केले आहे.