डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात डॉ फुलचंद सलामपुरे यांचा सेवागौरव
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ फुलचंद भगीरथ सलामपुरे हे ३० वर्षांच्या सेवेनंतर ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगरातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील संघटनांच्यावतीने १० ऑगस्ट रोजी त्यांचा नागरी सत्कार सोहळा करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष, अधिसभा, व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच १९८६ मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. गेली ३० वर्षे त्यांनी पंडित नेहरु महाविद्यालय व संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात अध्यापन कार्य केले. जिल्हा कुस्ती संघटना तसेच जिल्हा अॅथॅलॅटिक्स संघटनेचे सरचिटनिस म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच ’बामुक्टा’ प्राध्यापक संघटनेचे ते सरचिटणीस आहेत. प्राचार्य डॉ शिरीष पवार यांच्या अध्यक्षतेखली बुधवारी दि ३१ सकाळी ११:०० वाजता सेवा गौरव सोहळा होणार आहे.
प्राध्यापक, क्रीडा संघटनातर्फे सत्कार
जिल्हयातील क्रीडा क्षेत्रातील विविध संघटना व शैक्षणिक क्षेत्रातील संघटनाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात डॉ फुलचंद सलामपुरे यांचा सेवागौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक डॉ राजेश करपे व गोकुळ तांदळे यांनी दिली.