डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने जुन्या पॅटर्नच्या पदवी परीक्षा सुरु
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने बी ए व बी एस्सी अभ्यासक्रमांच्या (पॅटर्न – १३ व १४) सत्र परीक्षांना मंगळवारी (दि आठ) सुरुवात झाली. चार जिल्ह्यांतील ३३६ केंद्रावर ३५ हजार ५० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक डॉ भारती गवळी यांनी दिली.
कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. जुन्या पॅटर्नर्ननूसार परीक्षा देणाऱ्या अर्थत ’रिपीटर’ विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. या परीक्षेस कला शाखेतील तीन वर्षांचे मिळून १३ हजार ६२८ विद्यार्थी आहेत. तर विज्ञान विद्याखेतील ’बीएस्सी’चे २१ हजार ४२२ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. बीड, जालना, धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्हयात असे एकुण ३३६ परीक्षा केंद्र आहेत. दरम्यान, नियमित अभ्यासक्रमांच्या परीक्षा दिवाळीनंतर सुरु होणार आहेत.