आखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत ”डॉबाआंम” विद्यापीठाचे घवघवीत यश
अभय शिंदेला सुवर्ण तर निखिल वाघला रौप्य पदकासह दहा खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र
छत्रपती संभाजीनगर : जम्मू विद्यापीठ, जम्मू येथे सुरु असलेल्या आखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठचा आंतरराष्ट्रीय खेळाडु अभय शिंदे ने सेबर वैयक्तिक प्रकारात सुवर्ण तर निखिल वाघ ने त्याच प्रकारात रौप्य पदक पटकावुन विद्यापीठाचे नाव लौकीक वाढवले.
तसेच विद्यापीठाचे ईप्पी प्रकारात अनिल देवकर, महेश कोरडे, यश वाघ, आशिष डांगरे तर फॉइल प्रकारात गौरव गोटे, शाकेर सय्यद, ऋत्विक शिंदे, संयम नरवडे आदी खेळाडूंची खेलो इंडीया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 साठी निवड झाली. या खेळाडूंना प्रा डॉ उदय डोंगरे, संघ प्रशिक्षक आंतरराष्ट्रीय खेळाडू तुषार आहेर, संघ व्यवस्थापक डॉ पांडुरंग रानमाळ, अमृता भाटी आदींचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल कुलगुरू प्रा डॉ विजय फुलारी, प्र कुलगुरु प्रा डॉ वाल्मीक सरवदे, कुलसचिव प्रा डॉ प्रशांत अमृतकर, प्रभारी क्रीडा संचालक डॉ संदीप जगताप, डॉ उदय डोंगरे, प्रशिक्षक डॉ मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, किरण शूरकांबळे, अभिजीतसिंग दिक्कत, गणेश कड, डॉ रामेश्वर विधाते, मोहन वहीलवार आदींनी अभिनंदन केले.