डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा विधानसभेनंतर होणार

दिवाळीच्या सुट्टया २६ ऑक्टोबरपासून

पदवी परीक्षाही निवडणुकीनंतर

विद्यापीठ, महाविद्यालयांना सुट्टया जाहीर

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा आता विधानसभा निवडणूक निकालानंतर म्हणजेच २६ नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ भारती गवळी यांनी दिली.

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांचे संपूर्ण वेळापत्रक यंदा एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आले. यानूसार १५ जून ते २५ ऑक्टोबर या काळात प्रथम सत्र असणार आहे. विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांना येत्या २६ ऑक्टोबर पासून दिवाही सुट्टया जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव डॉ गणेश मंझा यांनी दिली.

Advertisement

विद्यापीठातील पदव्यूत्तर विभाग व धाराशिव उपपरिसरास २६ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान सुट्टया राहतल. हे विभाग ११ नोव्हेंबर रोजी सुरु होणार असून १ मे पर्यंत द्वितीय सत्र असणार आहे. तर संलग्नित महाविद्यालयांच्या २६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान दिवाळी सुट्टया असणार आहेत. तर १६ नोव्हेंबर ते १ मे २०२५ या काळात द्वितीय सत्र असणार आहे. पदवी परीक्षा विधानसभेनंतर

पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षाही दिवाळीनंतर तसेच विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहेत. पुर्वी या परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी सुरु होणार होत्या. मात्र आता या परीक्षा निवडणुक निकालानंतर होणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. यामध्ये सर्व परंपरागत अभ्यासक्रमांच्या परीक्षा असणार आहेत. तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहेत, अशी माहिती परीक्षा विभागातील कोऑडिनेशन युनिटचे सहायक उपकुलसचिव भगवान फड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page