‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील स्वागत कक्षामध्ये दि.२० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभगाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, प्रा. डॉ. दिपक शिंदे, प्रा. डॉ. बी. एस. सुरवसे, प्रा. डॉ. पी. विठ्ठल, प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड, प्रा. डॉ. संतोष बुटले, प्रा. आर. एस. मुन, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे, शिवराम लुटे, गोविंद हंबर्डे, रामदास खोकले, दिपक हंबर्डे, बंकटसिंह ठाकूर, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.