डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बी व्होक (इंडस्ट्री एम्बेडेड) ऑनलाईन अभ्यासक्रम लाँच
‘इंडस्ट्री-युनिव्हर्सिटी’ साथ साथ
बी व्होक इंडस्ट्री (एम्बेडेड) अभ्यासक्रम लाँच
पहिल्याच दिवशी सर्वच १०० जागांसाठी नोंदणी
थेअरी ऑनलाईन तर प्रॅक्टिकल थेट कंपनीत
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने कंपनीत नोकरी करणाऱ्या युवकांसाठी बी व्होक (इंडस्ट्री एम्बेडेड) हा ऑनलाईन अभ्यासक्रम ‘लाँच’ करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी सर्वच शंभर जागांसाठी नोंदणी झाली असून येत्या ऑगस्टपासून बॅच सुरु होणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दिनदयाल उपाध्याय कौशल केंद्र येथे येथे बॅचलर ऑफ व्होकेशनल स्टडीज (इंडस्ट्री एम्बेडेड) लाँच करण्यात आला. या संदर्भात कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि २८) व्यवस्थापन परिषद कक्षात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा विजय फुलारी होते.
यावेळी प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल पी एन अनंत नारायणन होते, तर प्र-कुलगुरू प्रा डॉ वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर, ‘मासिआ’चे अध्यक्ष चेतन राऊत (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल-स्केल इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर), डीडीयुकेच्या संचालक प्रा भारती गवळी, मेटिस्किल ग्लोबल सोल्युशन्सचे विंग कमांडर संदीप राज, सुंदर व्ही, (व्यवस्थापकीय संचालक), नुरुद्दीन ताहेर व्ही पी (ऑपरेशन्स), डेप्युटी कमांडर सूर्यवंशी, बाबासाहेब वाल्तुरे (बजाज ऑटो), इंद्रजित शाह, दीपक निकम आदी यावेळी उपस्थित होते.
उपाध्याय कौशल केंद्र व मेटिस्किल ग्लोबल सोल्युशन्सच्या सहकार्याने एक शैक्षणिक उद्योग-शैक्षणिक कनेक्शन साठी फॅसिलिटेटर आणि उत्प्रेरक असणार आहे. पदवी मिळवताना व्यावहारिक अनुभव मिळवा, विद्यार्थ्यांना संधी देऊन शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करणे हा या अभिनव उपक्रमाचा उद्देश आहे. अभ्यासक्रमासाठी पात्रता १२ वी, आयटीआय आणि डिप्लोमा. ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्रियल मध्ये बी वोक (इंडस्ट्री एम्बेडेड) अभ्यासक्रम ऑटोमेशन येत्या १ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. यावेळी विद्यापीठाशी संलग्न राहून कौशल्याधारित युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देऊ, अशी ग्वाही उद्योजकांनी दिली तर विद्यापीठ प्रशासन उद्योजकांसोबत सकारात्मक व कृतीशील सहकार्य करील, अशी ग्वाही कुलगुरु डॉ विजय फुलारी यांनी दिली. या विभागात बी व्होक (इंडस्ट्रियल ऑटोमेशन) व बी व्होक (ऑटोमोबाईल ) हे दोन अभ्यासक्रम अगोदर सुरू आहेत आता या नवीन अभ्यासक्रमाची भर पडली असून दोन्ही कोर्ससाठी प्रत्येकी ५० जणांची एका दिवशी नोंदणी झाली आहे.
कार्यक्रमास डॉ कुणाल दत्ता, डॉ विशाल उशीर, डॉ अमोघ सांबरे, गंगाधर बंडेवाड, रत्नदीप हिवराळे, सचिन रायलवार आदींची उपस्थिती होती. डॉ कुणाल दत्ता यांनी सूत्रसंचालन तर डॉ अमोघ सांबरे यांनी आभार मानले.