संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रामध्ये जाणीव जागृती कार्यक्रम
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करणारे
अमरावती : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे रोजगाराभिमुख कौशल्य विकसित करणारे धोरण आहे, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्वच प्रकारचे शिक्षण हे क्रेडीट बेस्ड, आऊटकम बेस्ड तसेच लवचिक आहे. इंटर्नशिप, अप्रेंटस्शीप, क्षेत्रभेटच्या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये अधिकाधिक रोजगाराभिमुख कौशल्य निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे, असे विचार डॉ. वैशाली गुडधे यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्र, ग्रंथालय, माहितीशास्त्र विभाग आणि वुमेन्स स्टडीज सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ या विषयावर ज्ञानस्त्रोत केंंद्राच्या सभागृहात जाणीवजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
डॉ. वैशाली गुडधे यांनी विषयाची मांडणी करतांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. 2023-24 पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये लागू होत आहे. विद्याथ्र्यांनी मिळविलेले क्रेडीट ते आयुष्यात कधीही वापरु शकतात अशा अनेक बाबी या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समाविष्य करण्यात आलेल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार ज्ञानस्त्रोत केंंद्राचे सहाय्यक ग्रंथपाल डॉ. विशाल बापते यांनी केले. कार्यक्रमाला वुमेन्स स्टडीज सेंटर, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.