वासंतीदेवी पाटील महाविद्यालयांत मतदान विषयी जनजागृती
कोडोळी : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये मतदान हक्क व मतदान कार्ड याबद्दल जनजागृती निर्माण करण्यात आली. ही जनजागृती राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्य साधून करण्यात आली. तसेच सदर दिवशी विद्यार्थ्यांना लोकशाही व मतदानाचा अधिकार याबद्दलचे महत्त्व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. मंजाप्पा यांनी दिले.
यावेळी वय वर्ष १८ पूर्ण असणाऱ्या पण मतदार नोंदणी केली नाही आशा विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी करण्यात आली. तसेच ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रक्रियानुसार नोंदणी केली होती, व मतदान कार्ड ऑनलाईन उपलब्ध झाले. त्याचे यादरम्यान कार्ड वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी संस्थेचे सचिव डॉ. जयंत पाटील व विश्वस्त विनिता पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या दरम्यान महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक वैशाली पोवार उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता माने यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. उमेश पाटील व प्रा. गौरव केकरे यांनी केले. यावेळेस महाविद्यालयातील इतर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.