आरोग्य विद्यापीठात गणेशोत्सवानिमित्त ‘अवघा रंग एक झाला’ नाटकाचे अभिवाचन

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गणेशोत्सवानिमित्त ‘अवघा रंग एक झाला’ नाटकाचे अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), प्र-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, बोधीकिरण सोनकांबळे, डॉ देवेंद्र पाटील, ब्रिग सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणण्यासाठी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाची ओळख व अध्यात्मिक भाव यांचा अनोखा मेळ ‘अवघा रंग एक झाला’ नाटकाचे अभिवाचन अनुभवण्यास मिळाला कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

Advertisement

सुप्रसिध्द लेखिका व दिग्दर्शिका पल्लवी पटवर्धन लिखित नाटकाचे अभिवाचन पल्लवी पटवर्धन समवेत श्रीराम गोरे, श्रीया जोशी, रेखा देशपांडे, अमोघी कुलकर्णी, सुगंधा शुक्ल या सहकलाकारांनी अभिवाचन केले तसेच वंदन वेलदे यांनी संगीत दिले. या अभिवाचनातून पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा अनुभव, प्रसंग व भक्तीचा लेखजोखा आपल्या ओजस्वी वाणीत मांडला.

‘अवघा रंग एक झाला’ नाटकाच्या अभिवाचनात सहभागी कलाकारांचा कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते रोपटे व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे समन्वयन जनंसपर्क अधिकारी डॉ स्वप्नील तोरणे यांनी केले. ‘अवघा रंग एक झाला’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव डॉ स्वप्नील तोरणे, सदस्य संदीप राठोड, मधुकर भिसे, संदीप महाजन, निलेश ओहोळ, आकांक्षा भोईर, आरती आहेर, नाना परभणे, रविंद्र रांधव, यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page