देवगिरी महाविद्यालयात ‘आवाज दो हम एक है’ कार्यक्रम उत्साहात संपन्न
सर्वधर्म समभाव सामाजिक सलोख्याचा आत्मा – प्राचार्य डॉ अशोक तेजनकर
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय युवा संगठन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आवाज दो हम एक है’ हा कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला. प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी युवकांमध्ये जनजागृती व्हावी, युवकांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे यासाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे आपल्या मार्गदर्शनात म्हटले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ विष्णू पाटील म्हणाले की, आजच्या युवकांची फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या समाजमध्ये वावरताना दिसत आहेत. युवकांनी क्षणिक सुखासाठी भविष्याकडे दुर्लक्ष करु नये. “आवाज दो हम एक है” हा उपक्रम अतिशय स्तूत्य असुन याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल; तसेच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य रूजविण्यात मदत होईल. प्रमुख वक्ते विनोद देवतळे याप्रसंगी म्हणाले.
‘भारत हा सुसंस्कृत देश आहे, भारताची संस्कृती टिकवण्याची जवाबदारी येथील युवकांची आहे, त्यांनी ती स्वीकारली पाहिजे. खरा तो एकची धर्म, भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा फक्त शाळा, महाविद्यालयच्याचार भिंतीमध्ये अडकून न राहता ती भावना सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे. याप्रसंगी मनोज ठाकरे यांनी दोन विचारधारा असलेल्या गीताचे सादरीकरण करून आपण योग्य विचारधारा निवडली तर आपला देश व देशवासी यांचे कल्याण होईल अशी भावना व्यक्त केली. भारत हमको प्यारा है या गीताद्वारे लताताई राजपूत यांनी युवकांना राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची प्रेरणा दिली. प्रशांत नात्रोसे यांनी ‘उठो हिंदुस्थान के वीर सपुतो’ या गीताद्वारे युवकांनी सर्वधर्मसमभाव पाळावा, जाती-पातीमध्ये न विभागता सर्वांनी एकत्र होऊन काम करुया असा संदेश दिला.
या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, कार्यक्रमाधिकारी सुवर्णा पाटील, ज्ञानेश्वर सोनुने, योगेश राऊत, शंतनु नात्रोसे, यामीनी गजपुरे, तेजस्विनी भोयर, रोहिणी देठे, मनिषा सोनुने, लता राजपूत यांच्या सह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ अनंत कनगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ भाऊसाहेब शिंदे यांनी केले.