अमरावती विद्यापीठात खेळाडूंचा सत्कार व क्रीडा संचालकांच्या कार्यशाळेचा समारोप

नवीन शैक्षणिक धोरणामुळे क्रीडा शिक्षकांना महत्वाचे स्थान

खेळाडूंनी विद्यापीठाचा नावलौकीक वाढविला – प्र – कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे

अमरावती : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे महाविद्यालयांमधील क्रीडा शिक्षकांना मानाचे स्थान मिळाले आहे. मात्र आता जबाबदारी सुध्दा वाढली असून, क्रीडा शिक्षकांनी सुदृढ पिढी तयार करण्यासाठी परिश्रम घ्यावेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा खेळाडूंनी नावलौकीक केला आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांनी केले. विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक यंच्या कार्यशाळेचा समारोप आणि उत्कृष्ट खेळाडूंच्या सत्कार समारंभाप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते.

व्यासपीठावर व्य प सदस्य डॉ तनुजा राऊत, प्रमुख अतिथी म्हणून अधिसभा सदस्य तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ सुभाष गावंडे, सदस्य डॉ विकास टोणे उपस्थित होते. डॉ ढोरे पुढे म्हणाले, ख्यातीप्राप्त डॉ अरविंद करवंदे यांचे कार्यशाळेमध्ये मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे. त्यामुळे क्रीडा संचालकांना त्याचा मोठा लाभ होईल, असे सांगून पुरस्कारप्राप्त सर्व खेळाडूंचे त्यांनी अभिनंदन करुन पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात.

प्रमुख अतिथी डॉ विकास टोणे म्हणाले, कार्यशाळेमध्ये मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मरगळ दूर झाली आहे. एवढेच नाही, तर शारीरिक आणि मानसिक विकासासाठी कार्यशाळा महत्वाची ठरली, परिणामी त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. डॉ सुभाष गावंडे म्हणाले, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयच नाही, तर ऑलम्पिक, आशियाई स्पर्धांमध्ये सुध्दा मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ खेळाडू घडविण्याचे मोठे कार्य करीत असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ मनोज व्यवहारे, डॉ रुपाली टोणे यांनी मनोगतातून कार्यशाळेतून खूप काही मिळाले असून त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगितले.

विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ठ ठरलेल्या खेळाडू्ंसह चमू व्यवस्थापकांचा सत्कार

उत्कृष्ट खेळाडू (मुले) म्हणून श्री संत गजानन महाराज महाविद्यालय, बोरगांव मंजूचा शिवाजी गेडाम याला रोख दहा हजार तसेच दक्षिण – पश्चिम विभाग बॉÏक्सग (पुरुष) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल रोख 3 हजार व अखिल भारतीय बॉÏक्सग (पुरुष) स्पर्धेत तृतिय क्रमांक पटकाविल्याबद्दल रोख 2 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट खेळाडू (मुली) ठरलेल्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची पुनम कैथवास हिला रोख दहा हजार तसेच दक्षिण – पश्चिम विभाग बॉÏक्सग (महिला) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल रोख 3 हजार रुपये व अखिल भारतीय बॉक्सिंग (महिला) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल रोख 5 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement

तसेच दक्षिण – पश्चिम आणि अखिल भारतीय बॉÏक्सग (महिला) स्पर्धेचे चमू व्यवस्थापक राजर्षी शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणाचे डॉ पी व्ही पिंगळे, अमरावतीची पूजा रहाटे, श्री संत गजानन महाराज महाविद्यालय, बोरगांव मंजूचे डॉ गजानन बढे,श्री शिवाजी महाविद्यालय, मोताळाचे प्रा संजय काळे, अमरावतीचे अनुप मिश्रा यांचा ट्रॅक सूट देऊन प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सत्कार केला.
दक्षिण-पश्चिम विभाग तायक्वांडो (पुरुष) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणा-या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा बासित पारे याला रोख 3 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र तसेच दक्षिण-पश्चिम विभाग तायक्वांडो (पुरुष) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची अनामिका डेका हिला रोख 3 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर चमू व्यवस्थापक एम ई एस. कला महाविद्यालय, मेहकरचे डॉ प्रमोद हुबाड, धनगरपुरा वलगाव येथील बलवंत बोबडे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचे डॉ नंदु चव्हाण, अकोला येथील विशाल वाघमारे यांचा ट्रॅक सूट देऊन प्र – कुलगुरूंनी सत्कार केला.

दक्षिण-पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ धनुर्विद्या (महिला) स्पर्धेत तृतिय क्रमांक पटकाविल्याबद्दल नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतची सानिका चांदुरकर हिला रोख 1 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, तर धनुर्विद्या (पुरुष) स्पर्धेत तृतिय क्रमांक पटकाविल्याबद्दल डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा यश भुसे याला रोख 1 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्र-कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अखिल भारतीय धनुर्विद्या (महिला) स्पर्धेत तृतिय क्रमांक पटकाविणा-या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीची साक्षी ढोकणे, तर पुरुषांच्या स्पर्धेत तृतिय क्रमांक पटकाविणाऱ्या विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारचा सुमित गुरमुले यांना प्रत्येकी दोन हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्र-कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर चमू व्यवस्थापक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगांव जामोदचे डॉ बी सी डाबरे, अमरावतीचे नितेश मंगुळकर यांचा ट्रॅक सूट देऊन प्र-कुलगुरूंनी सत्कार केला.

दक्षिण-पश्चिम कुस्ती (पुरुष) स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या युवाशक्ती शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा अतुल याला रोख 3 हजार रुपये, तृतिय क्रमांक पटकाविणाऱ्या सरस्वती महाविद्यालय, दहिहांडाचा गणेश नागे याला रोख 1 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्र-कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर चमू व्यवस्थापक आर एल टी विज्ञान महाविद्यालय, अकोलाचे डॉ राजेश चंद्रवंशी, अमरावतीचे अतुल तायडे व जितेंद्र ढिके यांचा, तसेच दक्षिण-पश्चिम जुडो (पुरुष) स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल बी बी कला महाविद्यालय, दिग्रसचा सागर जाधव याला रोख 2 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन तर स्पर्धेचे चमू व्यवस्थापक ए जी एम महाविद्यालय, मूर्तिजापूरचे डॉ दिलीप शहाडे यांचा ट्रॅक सूट देऊन प्र-कुलगुरुंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विद्यापीठाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुधाकर पांडे यांचा प्र-कुलगुरूंच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक डॉ तनुजा राऊत, सूत्रसंचालन डॉ शुभांगी दामले यांनी, तर आभार डॉ कविता वाटाणे यांनी मानले. कार्यक्रमाला नरेश देशमुख, अरुण लोहे, संतोष वानखडे, अब्दुल तौसिफ, सुधाकर पांडे, स्वप्निल बनसोड, धनराज भालेराव, कार्यशाळेकरिता उपस्थित असलेले संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण, उत्कृष्ट खेळाडू, नैपुण्यप्राप्त चमूतील खेळाडू, चमू व्यवस्थापक, चमू प्रशिक्षक तसेच खेळाडूंचा पालक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page