संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या लोकपाल पदी डॉ. श्रीकांत कोमावार यांची नियुक्ती

अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोग तसेच भारत सरकार यांच्या असाधारण भाग तीन, खंड चार प्रमाणे प्रकाशित केलेल्या राजपत्रकानुसार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मान्यतेने विधी महाविद्यालय, नागपूर येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. श्रीकांत कोमावार यांची संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या लोकपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राजपत्रामधील अटी व शर्तीनुसार लोकपाल पदावर रूजू दिनांकापासून तीन वर्षाकरीता किंवा त्यांच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत यात जे आधी असेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. कोमावार यांचे सार्वत्रिक अभिनंदन होेत आहे.

विद्याथ्र्यांच्या तक्रारीवर तातडीने निर्णय होणार

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्रांतील महाविद्यालये व विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात कार्यरत विद्यार्थ्यांच्या काही अडचणी, तक्रारी आहेत, पण त्यांना महाविद्यालय व शैक्षणिक स्तरावर न्याय मिळाला नाही, तर त्यांना लोकपालाकडे दाद मागता येईल. यासाठी त्यांना लेखी अपिल विद्यापीठाच्या लोकपाल यांचेकडे पाठविता येईल. विद्यार्थ्यांना काही लेखी तक्रार वा अपिल करावयाची असल्यास त्यांनी विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांचेकडे पाठवावी, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी प्रत्यक्ष वा दूरध्वनी क्र. 8855083964 यावर संपर्क साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com