महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी संचालक डॉ किरण कोकाटे यांची कृषि तंत्र उपयोजन संशोधन समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक

राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी संचालक विस्तार शिक्षण व नवी दिल्ली येथील भाकृअप चे माजी उपमहासंचालक (विस्तार शिक्षण) डॉ. किरण दत्तात्रय कोकाटे यांची कृषि तंत्र उपयोजन संशोधन संस्था झोन ५ (अटारी) मध्ये येणारे ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार या राज्यांसाठी नवीन कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेसाठी स्थान निश्चितीकरण समितीवर अध्यक्ष म्हणून सन २०२४ ते २०२६ या तीन वर्षासाठी नेमणूक झाली आहे.

Appointment of Dr. Kiran Kokate, former director of Mahatma Phule Agricultural University, as the Chairman of Agricultural Technology Application Research Committee

डॉ. किरण कोकाटे हे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक असून त्याआधी पाच वर्ष नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेत विस्तार विभागाचे उपमहासंचालक म्हणून कार्यरत होते. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील उपमहासंचालक हे पद केंद्राच्या कृषि मंत्रालयातील अतिरिक्त सचिवाच्या समकक्ष असलेले हे पद भुषविणारे ते महाराष्ट्र राज्यातील पहिले अधिकारी ठरले आहे. राष्ट्रीय पातळीवर विविध समित्यांवर ते अध्यक्ष व सदस्य म्हणून काम बघत आहेत. सध्या ते जोधपूर, राजस्थान येथील भाकृअप-केंद्रीय शुष्क विभागीय संशोधन संस्थेच्या (काझरी) संशोधन सल्लागार समितीवर अध्यक्ष तसेच पटना येथील भाकृअप-संशोधन संकुलावर अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. निक्राच्या तज्ञ सल्लागार समितीवर देखील ते सदस्य म्हणून आपले योगदान देत आहेत.

Advertisement

सन २००९ साली त्यांची उपमहासंचालक पदावर निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी देशातील ६३७ कृषि विज्ञान केंद्राचे नेतृत्व करुन त्या अंतर्गत असलेले दहा हजार प्रकल्प समन्वयक आणि विषय विशेषज्ञांद्वारे देशाच्या कृषि विस्ताराला नवी दिशा दिली. त्यांच्या प्रयत्नामुळे विभागीय प्रकल्प संचालनालयाचे नामांतर कृषि तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्थेत (अटारी) झाले. तसेच देशात आठ वरुन अकरा कृषि तंत्र उपयोजन संशोधन संस्था (अटारी) निर्माण केल्या. त्यात आपल्या राज्यात पुणे येथे एक अटारी संस्था मंजुर झाली आहे. उपमहासंचालक असताना त्यांनी कृषि विज्ञान केंद्राद्वारे देशात कृषि संशोधन आणि विस्ताराचे बळकटीकरण केले आहे. त्यांच्या या दुरदृष्टी व प्रभावशाली कार्यपद्धतीमुळे त्यांना कृषि विज्ञान केंद्राचे शिल्पकार संबोधले जाते. तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम कार्यक्रमाचे त्यांना जनक मानले जाते. याचप्रमाणे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा अट्रॅक्ट अँड रिटर्न युथ इन अग्रिकल्चर (आर्या) या प्रकल्पामध्ये त्यांचे मोठे योगदान लाभले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात संचालक, विस्तार शिक्षण या पदावर काम करताना त्यांनी विस्तार शिक्षणाला नवीन दिशा दिली आहे. त्यांच्या या योगदानामुळे त्यांना ओडिशा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार या राज्यांसाठी नवीन कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेसाठी स्थान निश्चितीकरण समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page