‘सेंटर फॉर इंटरनॅशनल’च्या संचालकपदी डॉ भास्कर साठे यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्स’च्या संचालकपदी डॉ भास्कर साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ भास्कर साठे

युरोपियन युनियन तसेच अन्य देशांशी शिक्षण व संशोधनासंदर्भात समन्वय ठेवण्यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून हे केंद्र विद्यापीठात कार्यरत आहे. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी या केंद्राच्या संचालकपदी डॉ साठे यांची नियुक्ती केली. डॉ बीना सेंगर यांच्याकडून त्यांनी मंगळवारी (दि ३) पदभार घेतला. यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे ‘युनिक’चे संचालक डॉ प्रवीण यन्नावार यांची उपस्थिती होती. डॉ साठे हे गेल्या १५ वर्षांपासून रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत.

नॅनो टेक्नॉलॉजी व फॉरेन्सिक सायन्स विभागाचे प्रमुखपद ही त्यांच्याकडे आहे. अधिसभा सदस्य व अविष्कार सेलचे ते संचालक आहेत. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे ते संशोधक विद्यार्थी असून अमेरिकेची फुलब्राईट फेलोशिप त्यांना प्राप्त झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com