अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ अविनाश असनारे यांची नियुक्ती

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलसचिव पदी डॉ अविनाश असनारे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी कुलसचिव पदाचा पदभार प्रभारी कुलसचिव मंगेश वरखेडे यांच्याकडून स्वीकारला. याप्रसंगी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ प्रवीण रघुवंशी, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ नितीन कोळी, अधिसभा सदस्य डॉ सुभाष गावंडे, डॉ प्रशांत विघे, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

डॉ असनारे हे यापूर्वी विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांना विद्यापीठ प्रशासकीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. याशिवाय परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी विद्यापीठाचे प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ नितीन कोळी, नवसंशोधन, नवोपक्रम व साहचार्य मंडळाच्या संचालकपदी डॉ अजय लाड आणि वित्त व लेखा अधिकारी म्हणून आय आय एम, नागपूरचे सहायक व्यवस्थापक डॉ पुष्कर देशपांडे यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे तसेच विविध प्राधिकारिणींचे सदस्य, विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक व कर्मचारी यांनी डॉ अविनाश असनारे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *