मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि २५/०८/२०२४ रोजी दुपारी १२:३० वाजता मंडळाचे अध्यक्ष आ प्रकाश सुंदरराव सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अध्यक्षांच्या सूचनेनुसार मंडळाचे सरचिटणीस, आ सतीश भानुदासराव चव्हाण यांनी सभेला सुरुवात केली.
या सभेला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अमरसिंह पंडित, शेख सलीम शेख अहमद, सहचिटणीस अनिल नखाते, प्रभाकरराव पालोदकर, कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, कार्यकारिणी सदस्य मोहनराव सावंत, हेमंत जामकर, आप्पासाहेब पाटील, भारत सोळुंके, त्रिंबकराव पाथ्रीकर, प्रकाश भांडवलदार, विश्वास पाटील, कल्याण तुपे, विश्वास येळीकर व संस्थेचे सभासद नरहरी निर्मळ, भाऊसाहेब ठोंबरे, विजय अण्णा बोराडे, पंडितराव हर्षे, राजेंद्र जगताप, गणेशराव दुधगावकर, द्वारकादास पाथ्रीकर, अविनाश बाळासाहेब जाधव, राधाकृष्ण पाटील, नितीन बागवे, विजय फलके, गंगाधर जगताप, अॅड सुखदेव शेळके, अॅड शशिकुमार चौधरी, उत्तमराव देशमुख, डॉ राजीव खेडकर, भगवानराव तांबे, शेख शमीम शेख अहमद, पंढरीनाथ पवार, अभिजीत देशमुख, विवेक जैस्वाल, कानन येळीकर, निलीमा सावंत, अंजली काळे, भावना नखाते, यांच्यासह बहुसंख्येने सभासदांनी सहभाग नोंदविला.
या सभेमध्ये विषय पत्रिकेतील विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व बहुमताने ठराव संमत करण्यात आले. संस्थेच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा झाली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व संस्थेचे सर्व उपस्थित सदस्यांचे सहचिटणीस प्रभाकरराव पालोदकर यांनी आभार मानले व राष्ट्रगीतानंतर अध्यक्षांच्या परवानगीने वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्याचे जाहीर केले.