अमरावती विद्यापीठाच्या ‘गँग शिवाजीची’ नाटकाला व्दितीय क्रमांक पटकावला
जी. एच. रायसोनी करंडक
अमरावती : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जी. एच. रायसोनी एकांकिका स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभागाने सादर केलेल्या ‘गँग शिवाजीची’ या नाटकाने द्वितीय क्रमांक प्राप्त करुन जी.एच. रायसोनी करंडकही पटकाविला. तसेच उत्कृष्ठ लेखन, दिग्दर्शनाचा सुध्दा तृतीय पुरस्कार प्राप्त केला. सदर स्पर्धेत प्रादर्शिक कला विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रां. वैभव देशमुख लिखित ‘गँग शिवाजीची’ ही एकांकिका सादर केली. अजिंक्य अलंकरी आणि निलेश ददगाळ यांची मुख्य भूमिका, तर सौरभ शेंडे याने दिलेली साथ, प्रकाश योजना प्रणव कोरे, संगीत धीरज इंगोले याने दिले.
स्पर्धेत महाराष्ट्रातील 31 एकांकिका सादर झाल्या. त्यातून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने 71 हजाराच्या रोख पुरस्कारासह द्वितीय क्रमांक पटकावून राज्यात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे नाव नाट्यक्षेत्रात मिळविले. उत्कृष्ट लेखक म्हणून प्रा. वैभव देशमुख, उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निलेश ददगाळ यांना तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. अमोल पानबुडे यांनी चमूचे नेतृत्व केले. या कामगिरीबद्दल कुलगुरू, डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख तसेच विभागाचे समन्वयक, डॉ. भोजराज चौधरी यांनी सर्व चमूंचे अभिनंदन केले आहे. एकांकिका यशस्वी करण्यासाठी प्रा.विराग जाखड, प्रा. रेणुका बोधनकर, प्रा. विश्वनाथ निळे, राजु इंगोले, द्वितीय वर्षाचे विद्यार्थी प्रविणकुमार राऊत, डॉ. सुवर्णा गाडगे, तसेच प्रथम व व्दितीय वर्षाचे विद्यार्थी, कर्मचारी गणेश कोंडे यांनी परिश्रम घेतले.