पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धेकरीता अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित
अमरावती : पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धा स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथे 22 ते 26 ऑक्टोबर, 2024 दरम्यान होणार असून स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
महिलांच्या चमूमध्ये गुलामनबी आझाद महाविद्यालय, बार्शिटाकळी येथील पायल श्रीनाथ, अंजली धानोरकर व अक्षदा धानेरकर, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाड येथील मंजुला पवार, सायली जाधव व उमा चव्हाण, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची वैष्णवी बोके, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, अकोलाची प्रिती सिरसाट, आरती खिल्लारे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची पुनम सोनी व अनुष्का बनसोड, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारची नयना वानखडे, राजश्री शाहु विज्ञान महाविद्यालय, चांदुररेल्वेची छकुली पिटेकर, जे डी पाटील सांगळुदकर महाविद्यालय, दर्यापूरची कल्याणी मेहर, बी बी आर्ट, एन बी कॉमर्स अॅन्ड बी पी सायन्स कॉलेज दिग्रसची साक्षी डांगळे, श्रीमती के के अग्रवाल कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूरची धनश्री राजपुत आणि बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळची राजनंदनी आडे हिचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडुंचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
चमूचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि 11 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.