अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी – 2024 बी ई, एम ए, एम ई परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी-2024 बी ई सेमिस्टर-4 (सीबीसीएस), एमए सेमिस्टर-2 (सीबीसीएस) फिलॉसॉफी आणि एम ई (एफ टी) सेमि -2 (सीबीसीएस) (डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स) या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
या संदर्भात सर्व संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्यार्थ्यांना कळवायचे आहे. तरी विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांना 9763833969 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.