संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची फ्लुईड डायनमिक्स -1 विषयाची पुनर्परीक्षा

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी -2023 एम.एस्सी. सेमि.-3 (मॅथेमॅटिक्स) (सी.बी.सी.एस.-नवीन) फ्लुईड डायनॅमिक्स -1 या विषयाची पुनर्परीक्षा दिनांक 15 फेब्राुवारी, 2024 रोजी परीक्षा केंद्र क्रमांक 301 वर घेण्यात येणार आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

यासंदर्भात संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, परीक्षा केंद्र यांना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून रितसर कळविण्यात आले असून परीक्षेकरीता यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र व परीक्षा क्रमांक कायम राहतील, याची सर्व संबंधित विद्याथ्र्यांनी नोंद घ्यावी व अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे पाटील यांचेशी 9763833969 या संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com