अमरावती विद्यापीठाची पर्यावरण अभ्यास विषयाची हिवाळी – 2024 परीक्षा 9 नोव्हेंबर रोजी

विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाद्वारे घेण्यात येणारी पर्यावरण अभ्यास विषयाची हिवाळी 2024 परीक्षा दि 9 नोव्हेंबर, 2024 रोजी दुपारी 2:00 ते 5:00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

ज्या परीक्षांना पर्यावरण अभ्यास या विषयाची परीक्षा देणे आवश्यक आहे, अशा परीक्षेस पात्र असलेल्या व परीक्षा आवेदनपत्र भरलेल्या हिवाळी-2024 मध्ये प्रवेशित होणाऱ्या माजी (सत्र/ सी जी एस/ सी बी एस एस पध्दती) विद्यार्थ्यांची (विधी व बी व्होकसह)) लेखी परीक्षा विद्यापीठाव्दारे निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर घ्यावयाची असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले आहे. याबाबत सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, शैक्षणिक विभाग यांना परीक्षा विभागाकडून पत्राव्दारे कळविण्यात आले असून याची सर्वसंबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे. तसेच काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक संचालक डॉ नितीन कोळी यांना 9850042357 मो क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com