अमरावती विद्यापीठात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

अमरावती : कामगार नेते, कथा, कादंबरीकार, कवी, नाट्य कलावंत, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले.

जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ राजीव बोरकर तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ विलास नांदुरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com