अमरावती विद्यापीठाची अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स विषयाची पुनर्परीक्षा ६ जुलै रोजी
विद्यापीठाची उन्हाळी – २०२४ ‘मास्टर ऑफ सायन्स (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) सत्र – ३ (सी बी सी एस नवीन) ३ एई १ डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग’ विषयाची पुनर्परीक्षा ६ जुलै रोजी होणार
विद्यार्थ्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या ‘मास्टर ऑफ सायन्स (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स) सत्र – ३ (सी बी सी एस नवीन) उन्हाळी-२०२४ परीक्षेतील ३ एई १ डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये एम सी क्यू (मल्टीपल चॉईस क्वेश्चन्स) न विचारल्या गेल्या संदर्भात विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीवर विद्यापीठ प्राधिकारिणींनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर विषयाची पुनर्परीक्षा दि ६ जुलै, २०२४ रोजी दुपारी ०२:०० ते ०५:०० या वेळेत आधीच्याच (परीक्षा केंद्र क्र १८०) परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
परीक्षेकरीता यापूर्वीच निर्गमित केलेले प्रवेशपत्र तसेच परीक्षा क्रमांक कायम राहील, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांनी कळविले आहे. यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना पत्राव्दारे कळविण्यात आले असून संबंधित विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालयांनी तातडीने अवगत करावे व काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितीन कोळी यांना ९८५००४२३५७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात येत आहे.