संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात योग थेरपी या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू
कौशल्ययुक्त व नाविण्यपुर्ण अभ्यासक्रमाची आज गरज
अमरावती : योग्य आहार-विहार-विश्रांती, शुद्ध विचार, प्राकृतिक जीवनशैली इत्यादी सर्व बाबी आजच्या काळाची गरज बनली आहे, परंतु आज सर्व बाबींचा अभाव दिसून येतो, व्यक्तीची दिनचर्या, जीवनशैली, आहार इत्यादी वेळेवर न झाल्यामुळे या सर्वांमध्ये बिघाड निर्माण झाल्याने घराघरामध्ये कुठल्या ना कुठल्या व्याधीने ग्रस्त व्यक्ती पहावयास मिळतात, या सर्वांवर मात करण्याकरिता व्यक्तीची जीवनशैली ही प्राकृतिक असणे गरजेचे आहे व त्याच बरोबर आहार-विहार आणि विश्रांती याचे समायोजन करणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे, ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागात पदव्युत्तर पदविका योग थेरपी या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
या अभ्यासक्रमामध्ये एकूण चार सिद्धांतिक व दोन प्रात्यक्षिक विषयाचा समावेश असून या अभ्यासक्रमाद्वारे योग चिकित्सा, वैकल्पिक चिकित्सा, निसर्गोपचार आणि शरीर क्रियाविज्ञान इत्यादी विषयांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमामध्ये चार विषयांच्या माध्यमातून प्रवेशित विद्यार्थ्यांला योग संबंधित सर्व प्रकारचे अभ्यास व क्रिया यांचे सखोल ज्ञान प्राप्त होते, एवढेच नाही तर त्याला या योगाभ्यासाच्या सोबत शरीर क्रियाविज्ञान समजने गरजेचे असते त्यामुळे याचाही समावेश या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे हा अभ्यासक्रम मुख्यत: योग या विषयावर आधारित असल्यामुळे या विषयावर अभ्यासक्रमामध्ये विशेषत: योग चिकित्सेची सर्व उपचार पद्धती शिकविल्या जातात.
परंतु आज समाजामध्ये विविध उपचाराच्या पद्धती वापरल्या जातो याबद्दलही विद्यार्थ्याला ज्ञान असावे या उद्देशाने या अभ्यासक्रमामध्ये वैकल्पिक चिकित्सा पद्धती शिकविल्या जातात या अंतर्गत विविध प्रकारच्या विना औषधी उपचार पद्धती चा समावेश होतो त्याकरीता पी.जी. डिप्लोमा इन योग थेरपी या अभ्यासक्रमाशीवाय पर्याय नाही.
पी जी डिप्लोमा इन योगा थेरपी हा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करणे एवढाच उद्देश न ठेवता विद्यार्थ्याला विषयासंबंधी परिपूर्ण ज्ञान प्राप्त व्हावे व त्याचबरोबर त्याला संबंधित इतर विषयांचेही ज्ञान अवगत व्हावे या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन विभागाद्वारे विद्यार्थ्याकरिता केल्या जाते. यामध्ये अभ्यास दौरा, व्याख्यानमाला, परिषद, संमेलन, योग शिबिरे, क्षेत्र भेट, इत्यादींचे आयोजन केल्या जाते. अशा पद्धतीने विविध उपक्रमांचे आयोजन अभ्यासक्रमाच्या सोबत केल्यामुळे विद्यार्थी संबंधित विषयांमध्ये निपूण होतो व त्याला सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींचे परिपूर्ण ज्ञान अवगत होते.
उपचार पद्धतींचे ज्ञान अवगत झाल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या विविध संधी त्याच्याकरिता उपलब्ध होतात कारण हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यक्ती विविध प्रकारच्या शासकीय/ निमशासकीय अथवा खाजगी रुग्णालयांमध्ये सेवा देऊ शकतो तसेच स्वतःचे योग चिकित्सा केंद्र सुरू करून उपचार देऊ शकतो एवढेच नव्हे तर विद्यालय आणि महाविद्यालय मध्ये योग शिक्षक म्हणून सुद्धा कार्य करू शकतो. इत्यादी प्रकारच्या विविध रोजगाराच्या संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होतात.
डॉ श्रीकांत पाटील संचालक व प्राध्यापक, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली असा हा नाविण्यापुर्ण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु असुन या अभ्यासक्रमास जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन समाजाभिमुख कार्यकरावे असे आवाहन कुलसचिव डॉ अविनाश असनारे यांनी केले आहे. अभ्यासक्रमासंबंधी अधिक माहितीकरिता प्रा आदित्य पुंड (समन्वयक) ७९७२३४४०६९/ ९६६५९५४६५६ / ८५५१०६४५४८ यांच्याशी संपर्क साधावा.