अमरावती विद्यापीठाच्या योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश समारंभ – 2024 कार्यक्रम संपन्न
योगशास्त्र जीवन जगण्याची कला
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विस्तार विभागातर्फे एम ए योगशास्त्र, पदव्यूत्तर पदवीका योग थेरपी, पदव्यूत्तर पदवीका नीसर्गोपचार आणि योगशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश समारंभ – 2024 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ श्रीकांत पाटील आजीवन अध्ययन विस्तार विभाग संचालक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना या प्रसंगी त्यांनी अभ्यासक्रमाबाबत सखोल माहिती दिली. तसेच पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमधील केंडीटस वर प्रकाश टाकला. त्याच प्रमाणे दोन वर्षात एक डिप्लोमा व एक डिग्री आपल्याला करता येईल या बद्वल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ आर के देशमुख, संचालक, पंजाबराव देशमुख योग महाविद्यालय, चांदूर बाजार, हे होते. त्यांनी योग आणि नैसर्गिक चिकित्सा याविषयी आपले विचार मांडले. त्यांनी योग आणि नैसर्गिक उपचाराच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकला आणि सूर्याच्या किरणांमधून मिळणाया व्हिटॅमिन डी, मातीचे स्नान (मड बाथ) इत्यादींचे महत्त्व समजावून सांगितले. डॉ देशमुख यांनी या क्षेत्रातील विविध संधी आणि रोजगाराच्या संधींवरही भर दिला. विद्यार्थ्यांना योग आणि नैसर्गिक चिकित्सा क्षेत्रात करिअर करण्यासाठी असलेल्या अनेक संधींची माहिती दिली. तसेच आजचे आधुनिक युगात झालेले बदल. व त्याचे होणारे परिणाम या मुळे, योग आज काळाची गरज झाली आहे.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ अनघा देशमुख यांनी केले. तसेच प्रस्ताविक प्रा आदित्य पुंड यानी केले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आभार प्रर्दशन प्रा स्वप्नील मोरे यानी केले.
या कार्यक्रमाला प्रा आदित्य पुंड, (समन्वयक एम ए योग शास्त्र), डॉ अश्विनी राउत, (समन्वयिका, पदव्युत्तर पदविका निसर्गोपचार आणि योगशास्त्र), प्रा राधिका खड़गे, (समन्वयिका, पदवित्तर पदवी का योग थेरेपी) तसेच डॉ बसवनाथे, प्रा स्वप्निल मोरे, डॉ अनघा देशमुख, प्रा स्वाती धंनस्कर, प्रा स्वप्निल ईखार, प्रा शिल्पा देव्हारे, प्रा वृषाली जवंजाळ, प्रा भूषण परडि़कर, प्रा राहुल दोडके, प्रा प्रफुल गांजरे, प्रा रवाले, प्रा पूजा मस्के, तसेच विद्यार्थी उपस्थित होते आणि सर्वांनी या प्रेरणादायक विचारांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग पाहता हा कार्यक्रम यशस्वी ठरला.