अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम पेट) 16 व 17 मार्च रोजी


संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, आचार्य पदवी पूर्व परीक्षा (एम पेट) – 2023 दि. 16 व 17 मार्च, 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठाने राजपत्र भाग- तीन मध्ये अधिसूचना प्रकाशित केली आहे. सदर परीक्षेबाबतची प्रवेशपत्रे व परीक्षेचा निकाल परीक्षार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडी वर पाठविण्यात येणार आहे.

Sant Gadge Baba Amravati University, SGBAU

तरी सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक मोनाली तोटे पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी किंवा आचार्य कक्षाचे उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण यांचेशी प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी क्रमांक 9422724895 यावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com