गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये २०१६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न 

जळगाव : गोदावरी नर्सिंग कॉलेजमध्ये २०१६ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला २०१६ बॅचच्या दीक्षा धनविजय आणि कृतिका धमादे यांनी विशेष उपस्थिती लावली.

या मेळावा दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आपल्या अनुभवांचा आदान-प्रदान केला. २०१६ पासून २०२४ पर्यंतच्या कार्यकाळात कॉलेजमध्ये झालेल्या विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या भौतिक, शैक्षणिक आणि तांत्रिक प्रगतीबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त करत आपल्या आठवणींना उजाळा दिला.

विद्यार्थी मेळाव्याने महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये एक स्नेहपूर्ण नाते निर्माण करण्यास हातभार लावला. महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com