डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
पिंपरी : डॉ डी वाय पाटील यूनिटेक सोसायटीच्या डॉ डी वाय पाटील कॉलेज ऑफ एज्युकेशन (बी एड एम एड) पिंपरी पुणे येथे एम एड विभागातील माजी विद्यार्थीच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी डॉ डी वाय पाटील यूनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी डी पाटील साहेब व डॉ डी वाय पाटील यूनिटेक सोसायटीचे सचिव डॉ सोमनाथ पी पाटील सर यांच्या प्रेरणेतून व महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रेखा पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. एम एड पूर्ण झालेल्या सर्व बॅचेसमधील माजी विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाचे सादरीकरण केले याच माध्यमातून जुन्या आठवणींना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ रेखा पाठक यांनी केले महाविद्यालयात पीएच डी संशोधन केंद्राची आणि संशोधन सुविधा विभाग सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रेखा पाठक यांच्या हस्ते मान्यवर व माजी विद्यार्थ्यांना तुळशीचे रोपटे देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. तसेच कौतुकाचे प्रतीक म्हणून सर्व प्रमुख माजी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि नामवंत माजी विद्यार्थी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख माजी विद्यार्थ्यांनी सरोज रमण, सोनाली बालवटकर, प्रियांका तेलोरे, फरजाना शेख, सोनाली मापुस्कर आणि अनुराधा काळोखे आदी यांनी सर्वांशी संवाद साधत, एम एड शिक्षण घेत असताना आलेले अनुभव, त्यांचे सध्याचे कामाचे ठिकाण, एम एड चे महत्त्व आणि सद्याच्या कामात एम एड च्या शिक्षणाचा व्यावसायिक वाढीसाठी कसा उपयोग झाला याची माहिती दिली.माजी विद्यार्थ्यांनीही आजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि उच्च शिक्षण आणि नोकरीविषयक तयारी करण्याबाबत प्रेरक भाषण केले.
हा कार्यक्रम आनंददायी करण्यासाठी प्रा डॉ करन भिसे यांनी “नॉक नॉक: आउट-आउट” या खेळाचे आयोजन केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी खेळाचा आनंद लुटला. सहाय्यक प्राध्यापक किरण खोत, (माजी विद्यार्थी मेळावा प्रमुख) यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून त्यांना भविष्यात यश मिळवून देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता व आभारप्रदर्शन डॉ उर्मिला व्यवहारे यांनी केले.