अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य कलेचा जागर स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल जाहिर
बीड : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्य कलेचा जागर स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल जाहिर झाला असून एकांकिकेत प्रगती सेवाभावी संस्था पाडळीची -नवस, स्फुर्ती ग्रुप गेवराईचे बालनाट्य – देवाचीया दारी, तर नाट्य अभिवाचनात सिंदफना पब्लीक स्कुल माजलगावचे -दगडूला पडलेले प्रश्न सर्वोत्कृष्ट ठरले आहे. या सर्वांची उपान्त फेरित निवड झाली असून मार्च 9 पासून पुणे,नगर व मुंबई येथे उपान्त फेरी होणार आहे.
100 व्या नाट्य संमेलना निमित्त नाट्य कलेचा जागर संपूर्ण महाराष्ट्रभर 22 ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. बीडमध्ये देखील त्या स्पर्धा घेण्यात आल्या. एकांकिका, बालनाट्य, नाटय अभिवाचन या स्पर्धेचा समावेश होता यातील निकाल पुढील प्रमाणे
एकांकिका – नवस -प्रथम प्रगती सेवाभावी संस्था पाडळी, लेखक ,दिग्दर्शन संतोष पैठणे, उत्तर दायित्व – द्वितीय- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव तर तृतीय -विच्छेदन -नाट्यशास्त्र विभाग के.एस.के.महाविद्यालय लेखक दिग्दर्शन विजय राख, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र पुढील प्रमाणे शितल चव्हाण -गोदा, औंकार वहे, अजता किरकसे -उत्तरदायित्व, विशाल रणदिवे- शेवट तीनकासा गंभीर नाही, सोनाली शहाणे,सुरेश थोरात – संगीत दुष्यंता, अशोक कानगुदे -विच्छेदन, विठ्ठल जोगदंड, अंकुर तांगडे व ऋषिेकेश रत्नपारखी- नवस, बालनाटय -देवाचीया दारी प्रथम -स्फूर्ती बालनाटय ग्रुप गेवराई, जिनीअस ग्रुप बीड- सावू – द्वितीय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बीडचे बालनाट्य – सायोनारा – तृतीय आले आहे.तर अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र सानदा जोशी,आयुष दांडेकर- देवाचिया दारी कैमुदी रूईकर- सायोनारा, उन्नती भराटे, अनिकेत वाघमारे – सावू, राजवीर शिंदे-एलियन्स द ग्रेट, तनिष रेदासनी – लग्न मुक्ताच – अभय राऊत,फॅक्टरी सावरगाव यांना मिळाली.
नाटय अभिवाचन – प्रथम – दगडूला पडलेले प्रश्न सिंदफना पब्लिक स्कूल माजलगाव, द्वितीय -कस्टमर केअर- नाट्यशास्त्र विभाग डॉ.बा.आ.म.विद्यापीठ उपपरिसर धाराशिव तर तृतीय अश्वमेध -नाटयसंघ परळी वै. यांच्या संघाला पारितोषिके मिळाले.
सर्व विजेत्यांचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, बीड नाटय परिषदेच्या अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर,नाटयशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय पाटील देवळाणकर,भरत लोळगे, विद्यासागर पाटांगणकर, डी.एस.कुलकर्णी, डॉ.दुष्यंता रामटेके,डॉ.विजय राख, मिलींद शिवणीकर,डॉ. रूक्मीनीकांत राहूल पांडवसह सर्व नाट्य परिषद सदस्यांनी अभिनंदन केले व उपांत्य फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.