पंतप्रधानांचे सल्लागार, गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये सर्वोच्च पदाचा कार्यभार स्वीकारणार

गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपतीपदी डॉ बिवेक देबरॉय यांची नियुक्ती

पुणे : सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (एसआयएस) आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स यांनी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे नवे कुलपती म्हणून डॉ बिबेक देबरॉय यांची नियुक्ती केली आहे. देबरॉय हे सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकारसाठी थिंक टँक म्हणून काम करणाऱ्या नीती आयोगाचेही ते सदस्य होते.

डॉ बिवेक देबरॉय

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. अर्थशास्त्र आणि धोरण निर्मितीच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय प्रभावी आणि महत्त्वपूर्ण आहे. पुरातन भारतीय साहित्य क्षेत्रात त्यांनी विपुल प्रमाणात भाषांतर तसेच संशोधनपर लेखलाचे काम केले आहे. त्यांच्या या योगदानासाठी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे सर आर जी भांडारकर स्मृती पुरस्कार (२०२३) देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. भारतीय नागरिकत्त्व सन्मानातील चौैथ्या क्रमांकाचा सन्मान असलेल्या पद्मश्री पुरस्कार (२०१५) देखील त्यांनी भूषविलेला आहे. 

त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांनी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये देखील (१९८३-८७) काम केले आहे.

कुलपती पदी डॉ देबरॉय यांची नियुक्ती गोखले इन्स्टिट्यूटसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी संस्थेला शिक्षण. संशोधन तसेच धोरण निर्मिती क्षेत्रात उच्च पातळीवर नेऊन ठेवेल यात शंका  नाही. 

बिबेक देबरॉय यांच्याबद्दल

विवेक देबरॉय हे अर्थतज्ज्ञ असून त्यांचे शिक्षण रामकृष्ण मिशन स्कूल, नरेंद्रपूर येथे झाले. प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता; दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज.येथे देखील ते शिकले. सध्या ते पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (ईएसी-पीएम) अध्यक्ष आहेत. त्यांनी कुलपती, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे, महाराष्ट्र शासन हे पदही भूषविले आहे. त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेज, कोलकाता (१९७९-८३), गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे (१९८३-८७) येथे काम केले आहे; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड, दिल्ली (१९८७-९३); अर्थ मंत्रालय / यूएनडीपी प्रकल्पाचे संचालक म्हणून (1993-98); आर्थिक व्यवहार विभाग (1994-95); नेशनल काउंसिल ऑफ अप्लाइड इकोनॉमिक रिसर्च (1995-96); राजीव गांधी इंस्टिट्यूट फॉर कंटेम्पररी स्टडीज (1997-2005); पीएचडी चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (2005-06); सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (२००७-१५), नीती आयोगाचे सदस्य (२०१५-१९); आणि अध्यक्ष, भारतीय सांख्यिकी संस्था (151) (2018-22) अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यांनी अनेक पुस्तके, शोधनिबंध आणि लोकप्रिय लेखचे लेखन/संपादन केले आहे आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये ते सहयोगी (सल्लागार) संपादक देखील आहेत.

Advertisement

 पुरस्कार

आजवर त्यांना मिळालेल्या काही महत्त्वाच्या पुरस्कारांची माहिती खालीलप्रमाणे

आर्थिक पत्रकारितेसाठी श्रीराम सनलम पुरस्कार (२०१३), भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री (२०१५), केआयआयटी विद्यापीठातर्फे मानद डी.लिट (२०१५), एमिटी विद्यापीठातर्फे मानद डी.फिल (२०१६), जागरण लेकसिटी विद्यापीठातर्फे मानद  डी.फिल (२०१७), अभियांत्रिकी विद्यापीठातर्फे मानद  डी.एस्सी (२०१८) यूएस-इंडिया बिझनेस समिटचा जीवनगौरव पुरस्कार (२०१६), स्कॉच चॅलेंजर गोल्डन ज्युबिली पुरस्कार (२०१७), प्रेस्टीज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चचा जीवनगौरव पुरस्कार (२०१८) आणि पॉवर ब्रँडचा “भारतीय मानवता विकास पुरस्कार” (२०१८). तसेच श्री लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठातर्फे त्यांना “वाचस्पती” (२०१८) पदवी आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे तर्फे २०२३ मध्ये त्यांना “सर आर. जी. भांडारकर स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी बद्दल

सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना १९०५ साली गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुणे येथे केली. गोखले हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख नेते आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य होते. भारताच्या स्वातंत्र्याची गुरुकिल्ली शिक्षण आणि समाजसुधारणेत आहे, असे त्यांचे मत होते. भारतातील तरुणांना नि:स्वार्थी आणि समर्पित सेवक बनून देशसेवेसाठी प्रशिक्षित करण्यासाठी त्यांनी संस्थेची स्थापना केली.

गोखले इन्स्टिट्यूट बद्दल

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने १९३० मध्ये केली. अर्थशास्त्रातील ही देशातील सर्वात जुनी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था भारतीय समाजाच्या सामाजिक-आर्थिक आयामांवर संशोधन करण्यासाठी समर्पित आहे आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचा वारसा पुढे नेत आहे. गोखले यांनीच १९०५ मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाला चालना देणे आणि नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रावर राज्य करण्यासाठी भारतीयांमध्ये क्षमता विकसित करणे हा त्यांचा युक्तिवाद होता. गेल्या काही दशकांत संस्थेने संशोधन क्षेत्रात भक्कम कामगिरी करत स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page