डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे संस्थेत २४ अभ्यासक्रमांना प्रवेश
चार विषयात पदव्यूत्तर पदवी
वीस विषयात पदविका, सर्टिफिकेट कोर्स
छत्रपती संभाजीनगर : डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत (जीएमएनआरडी) ग्रामविकासावर आधारित २४ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.
ग्रामविकास व शेतीपुरक उद्योगांना प्रोत्साहन व संशोधनाच्या दृष्टीने सदर संस्था कार्य करीत आहे. कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये मास्टर ऑफ रुरल स्टडीज (एमआरएस), सोसियो कल्चर अॅण्ड पॉलिटिकल अस्पेक्टस्, एम एस्सी – रुरल टेक्नॉलॉजी, एमएस्सी कंझर्व्हेशन ऑफ बायोडायव्र्हसिटी या चार पदव्यूत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहेत.
या अभ्यासक्रमास पदवीधर विद्यार्थी पात्र आहे तसेच पदविका अभ्यासक्रम ६ महिने फळे व भाजीपाला प्रक्रिया, जल व भूमी व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, फलोद्यान व रोपवाटिका व्यवस्थापन रोपांचे उती संवर्धन, पशुधन उत्पादन व व्यवस्थापन, मधुमक्षिका पालन व व्यवस्थापन, मत्स्यपालन व व्यवस्थापन, महिला व बालकांचे पोषण व्यवस्थापन आदी पदविका अभ्यासक्रम आहेत. तसेच पंचयतराज व्यवस्थापन, स्वयंसहायता बचतगट संघटन व व्यस्थापन, फळे व भाजीपाला प्रक्रिया, फळे व भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया, फलोत्पादन व रोपवाटिका व्यवस्थापन, रोपांचे उती संवर्धन, मधुमक्षिका पालन, ज्येष्ठ नागरिक सेवासुशृषा, आळंबी उत्पान तंत्रज्ञान, बेकरी तंत्रज्ञान या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे संचालक आवाहन संचालक डॉ संजय साळुंके यांनी केले आहे.