महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबीर

सीमा भागातील विद्यार्थ्यांना दूरशिक्षणाची संधी : डॉ.संजय कुबल

 बेळगाव : दूरशिक्षणाच्या माध्यमातून सीमा भागातील विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्चशिक्षणाची सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातील   उप कुलसचिव डॉ.संजय कुबल यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने बेळगाव येथे शैक्षणिक वर्ष  2023-24 साठी महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगळे होते. यावेळी खानापूर मतदारसंघाचे माजी आमदार दिगंबर पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य एम. जी. पाटील व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.  

Advertisement
Admission process guidance camp for students from Maharashtra and Karnataka border areas

डॉ. संजय कुबल म्हणाले की, शिवाजी विद्यापीठ व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेहमीच सीमा भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असेल. तसेच दूरशिक्षण अंतर्गत दुहेरी पदवीचा लाभ विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.

बेळगाव महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री.मालोजी अष्टेकर म्हणाले की,शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रातर्गत विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची सुवर्णसंधी आपल्या दारी आली आहे, त्याचा लाभ सीमा भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.तसेच यावेळी डॉ.चांगदेव बंडगर, डॉ.सचिन भोसले, डॉ.मुफीद मुजावर व डॉ.सुशांत माने यांनी बी.ए.,बी.कॉम.,एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी, राज्यशास्त्र , अर्थशास्त्र, समाजशास्त्र व इतिहास), एम.कॉम.,एम एस्सी.(गणित) विविध अभ्यासक्रमाबद्दल व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंबधी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नाचे निरसन केले.   

यावेळी प्रास्ताविक व स्वागत करताना डॉ.के.बी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन करून शिवराज पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page