अमरावती विद्यापीठात इग्नो अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस दि २८ फेब्राुवारी पर्यंत मुदतवाढ
एस सी, एस टी वर्गवारीतील विद्यार्थ्यांना पदवी करिता नि:शुल्क प्रवेश
अमरावती : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत जानेवारी, 2025 पासून सुरू झालेल्या सत्राकरिता एम ए ( इंग्रजी, हिंदी, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, ग्रामीण विकास, दूरशिक्षण, तत्वज्ञान), एम कॉम, एम बी ए, (फायनान्स, ह्रुमन रिसोर्स, मार्केटिंग, ऑपरेशन, सर्वीस मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेशिवाय) बी ए, बी कॉम सामान्य, बी ए टुरिझम, बी ए ऑनर्स (अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, इंग्रजी, हिंदी), बी कॉम (लेखा व वित्त).

पदव्युत्तर पदविका (ग्रामीण विकास, इंटरनॅशनल बिझिनेस ऑपरेशन, अॅग्री बिझिनेस, ह्रुमन रिसोर्स मॅनेजमेंट, फायनान्सीयल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट आणि मार्केटिंग मॅनेजमेंट), डिप्लोमा (पर्यटन, एचआयव्ही अँड फॅमिली एज्युकेशन), सर्टिफिकेट (आपत्ती व्यवस्थापन, फुड अॅन्ड न्युट्रीशन, ह्रुमन राईट्स, गायडन्स, न्यु्ट्रीशन अॅन्ड चाईल्ड केअर, कंझुमर प्रोटेक्शन, फक्शनल इंग्रजी, ग्रामीण विकास, टिचींग ऑफ इंग्लीश, टुरिझम, एचआयव्ही अँड फॅमिली एज्युकेशन) इत्यादी अभ्यासक्रमांकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे.
इग्नोच्या www.ignou.ac.in वेबसाईटवरून तसेच https://ignouadmission.samarth.edu.in/ ह्रा लिंकवरून अर्ज सादर करण्याची अंतिम तिथी दिनांक 28 फेब्राुवारी, 2025 पर्यंत वाढविण्यात आली असून प्रवेश शुल्क इंटरनेट बँकींग/डेबीट/क्रेडीट/एटीएम कार्डद्वारे भरता येईल. सविस्तर माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबाबतची माहिती इग्नोचे उपरोक्त वेबसाईटवर उपलब्ध आहे.
अनुसुचित जाती/ जमाती वर्गवारीतील विद्यार्थ्यांना बी ए, बी कॉम बी एस्सी पदवी करिता नि:शुल्क प्रवेश देण्यात येत आहेत. अधिक माहितीकरिता इच्छुकांनी इग्नोचे अभ्यासकेंद्र, मुलींचे वसतीगृहाजवळ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसर येथे सकाळी 8:30 ते 10:30 या वेळात संपर्क साधावा असे डॉ वर्षा नाठार, समन्वयक, इग्नो अभ्यासकेंद्र, अमरावती यांनी कळविले आहे.