कला व मानव्यविद्या प्रशाळेअंतर्गत संगीत विभागात प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरु

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कला व मानव्यविद्या प्रशाळेअंतर्गत संगीत विभागात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी पदविका व एम ए गायन, वादन (तबला) तसेच नाट्यशास्त्र या विषयासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश देणे सुरु आहेत.

Kaviyatri Bahinabai Chaudhary North Maharashtra University, Jalgaon
KBCNMU

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून विविध व्यावसायिक संधी या अभ्यासक्रमामुळे मिळू शकतात त्यासाठी विद्यापीठातील कला व मानव्यविद्या प्रशाळेअंतर्गत संगीत विभागात पदविका व पदव्युत्तर एम ए साठी गायन, वादन (तबला) व नाट्यशास्त्र विषयात प्रवेश सुरू असून या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै, २०२४ पर्यंत प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ मनोज गुरव (९४२३१४६६१८) व तेजस मराठे (९२२६२५७०५२) अशी माहिती प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा राम भावसार यांनी ‍दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com