महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात अभिनेता आमिर खान यांचे स्वागत
वर्धा : प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता आमिर खान यांचे रविवारी २३ जून रोजी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आगमन झाले. त्यांचे आगमन होताच नागार्जुन अतिथीगृहात कुलगुरू प्रो कृष्ण कुमार सिंह आणि कुलसचिव प्रो आनन्द पाटील यांनी अंगवस्त्र, सूतमाळ व चरखा देवून स्वागत केले. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२४ अंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रमानिमित्त आमिर खान वर्धा येथे आले होते.
विश्वविद्यालयाच्या कस्तूरबा सभागृहात त्यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर जिल्हा अधिकारी नरेन्द्र फुलझेले, पानी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकल, डॉ अविनाश पोळ, कृषी विभागाचे प्रादेशिक सहसंचालक शंकर तोटावार, प्रकल्प निदेशक विश्वास सिद, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेयरमन विलास शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी विश्वविद्यालयाच्या टागोर सांस्कृतिक संकुलाच्या निराला सभागृहात फार्मर कप स्पर्धा २०२४ शी संबंधित हजाराहून अधिक शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये आमिर खान यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी शेती शाळा, गट शेती, पाणी बचत आदींबाबत दिलखुलासपणे चर्चा केली. शेती आणि चित्रपट यांच्यातील नाते यावरही त्यांनी आपले मत मांडले.
यावेळी त्यांनी नागार्जुन अतिथीगृहात कुलगुरू, कुलसचिव आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून विश्वविद्यालयाची माहिती जाणून घेतली.
यावेळी राजेश अरोड़ा, डॉ राजेश्वर सिंह, के के त्रिपाठी, बी एस मिरगे, राजेश यादव, सुधीर खरकटे, कमल शर्मा, राजीव पाठक, विवेक त्रिपाठी, शुभम सोनी आदी उपस्थित होते. विश्वविद्यालयाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली.